
उ. सोलापूर : पत्नी व तिच्या मामाचे कुटुंब आपला छळ करत असल्याचा आरोप करत तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणाने व्हिडिओ तयार करत नातलगाला पाठवला. त्याचबरोबर आत्महत्या स्थळाचे लोकेशन ही पाठवले. अमर लहू मुळे असे या तरुणाचे नाव आहे. वांगी येथील वनक्षेत्रात शनिवारी या तरुणाने आत्महत्या केली. रविवारी (ता. ३) हा प्रकार उघडकीस आला.