तोंड बंद ठेवा अन्यथा पळता भुई थोडी होईल; धर्मराज काडादी

श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा विषय सध्या महाराष्ट्रात गाजत आहे
तोंड बंद ठेवा अन्यथा पळता भुई थोडी होईल; धर्मराज काडादी
तोंड बंद ठेवा अन्यथा पळता भुई थोडी होईल; धर्मराज काडादीsakal media

सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा विषय सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. सोलापुरातील काही राजकारणी मंडळी हे सोलापूर विकास मंचच्या कार्यकर्त्यांच्या आडून राजकारण करत आहेत. ते राजकारण अतिशय घृणास्पद असल्याचे मत सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी आज व्यक्त केले आहे.

तोंड बंद ठेवा अन्यथा पळता भुई थोडी होईल; धर्मराज काडादी
Omicron: किशोरी पेडणेकर म्हणाल्या, चिंता वाढली त्यात काहीच दुमत नाही, मात्र...

व्यक्तिगत द्वेष, असूया बुद्धी, मस्तवाल अहंकार या माध्यमातून काही मंडळी सोलापूरचा विकास तर सोडाच, सोलापूर भकास करण्याच्या मागे लागलेली आहेत. हे कुठेतरी ताबडतोब थांबले पाहिजे. सहकार चळवळ व चांगल्या प्रवृत्ती संपविण्याचा हा घाणेरडा प्रकार सर्व सोलापूरकरांनी वेळीच ओळखुन मोडून काढला पाहिजे अशी अपेक्षाही काडादी यांनी व्यक्त केली आहे. कारखान्यावर आज जो वीज खंडित करण्याचा प्रयत्न झाला, त्यानिमित्ताने शेतकरी सभासद व कर्मचारी यांचा आक्रोश सोलापूर जिल्ह्याने, शासनाने अनुभवला आहे. हा आक्रोश समजून घेत प्रशासनाने माघार घेतली हे अतिशय चांगले झाले. थोबडे, आडके यांच्यासह विकास मंचच्या मंडळींना सभासद व कामगारांचा आक्रोश समजला असेल, तर त्यांनी आपली तोंडे बंद करावीत. अन्यथा शेतकरी व कामगार एकदा पेटून उठला तर या मंडळींची पळता भुई थोडी होईल व त्यास मी जबाबदार राहणार नसल्याचेही काडादी यांनी सांगितले.

तोंड बंद ठेवा अन्यथा पळता भुई थोडी होईल; धर्मराज काडादी
मोठी बातमी: महाराष्ट्रात सापडला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

काय म्हणाले होते थोबडे...

सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या सभासदांची धर्मराज काडादी यांनी आजपर्यंत फसवणूक केली आहे, दिशाभूल केली आहे. वारंवार खोटी वक्तव्ये करून आपली बेकायदेशीर कृत्ये लपविण्यासाठी त्यांनी आजवर प्रयत्न केले आहेत.चिमणी पाडल्यावर देखील पंधरा दिवसात यंत्रणा कार्यान्वित करून पुन्हा कारखाना चालू करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी, सभासद, उत्पादकांनी तसेच कामगारांनी आणि ठेकेदारांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही अशी भूमिका संजय थोबडे यांनी मांडली आहे. त्यावर काडादी यांनी आज उत्तर दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com