हात नका लावू माझ्या "चिमणी'ला!

सरकारनुसार मोळीचे मानकरीही बदलले
हात नका लावू माझ्या "चिमणी'ला!
हात नका लावू माझ्या "चिमणी'ला! sakal media

- प्रमिला चोरगी

सोलापूर : जिल्ह्याचे राजकारण एकीकडे आणि "हम करे सो कायदा' या तत्वाने चालणारे उद्योजक धर्मराज काडादी एकीकडे. कारखान्यातील संचालक निवडीमध्ये काडादींचा या तत्वाचा झालेला अतिरेक. त्यामुळे आजी, माजी आणि भावी संचालकांचे दुखावलेले आत्मे. राजकारणात काडादींचे अतिशय निकटवर्ती समजले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे संपलेले राजकारण. राज्यातील सत्ता पालट, अशी एक-ना अनेक चक्रीवादळं चिमणीवर आदळली. आता चिमणीचे भवितव्य अंधारात असतानादेखील काडादी "हात नका लावू माझ्या चिमणीला' म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

हात नका लावू माझ्या "चिमणी'ला!
पंजाबमध्ये कंगना रणौतच्या गाडीला जमावाने घेरलं

सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनच्या चिमणीचा चिवचिवाट गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यात काडादी यांना संचालक मंडळ मिरविणारे नको, तर नैतिक जबाबदारी स्वीकारणारे हवे, असा सल्ला एका माजी नेत्यांनी दिला. हे खरेच आहे. दहा वर्षांपूर्वी कारखाना संचालक मंडळ निवडीमध्ये ज्यांना डावलले, ज्यांना घेतले त्यांना कोणतेच अधिकार दिले नाहीत. या सगळ्यांनीच काडादींचा हेकेखोरपणा मोडीत काढण्यासाठी चिमणीवर निशाणा साधला. चिमणी पाडण्याची शपथ घेत कायदेशीर मार्गाने या चिमणीची वाट लावण्याचे या मंडळींनी ठरविले. ही मंडळी काडादी घराण्याची पोहोच ओळखून होती. काडादी यांना राजकीय यंत्रणेची नाडी ओळखण्याची कला चांगलीच अवगत आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील नेत्यांचा काडादींवर असलेला वरदहस्त व त्यांच्या उद्योजक वलयाच्या प्रभावाने नेहमीच "हात नका लावू माझ्या चिमणीला' म्हणत विरोधकांचे मनसुबे हाणून पाडण्यात ते आजपर्यंत यशस्वी झाले. सिध्देश्‍वर साखर कारखान्याची ही चिमणी पाडल्याशिवाय, शहराचा विकासच होणार नाही. असा शहर विकासाचा वसा घेतलेल्या मोजक्‍या लोकांनी विमानसेवेचा विषय पुढे केला असला तरी चिमणीमधील कावळ्यांचे राजकारण सोलापूरकर ओळखून आहेत.

सन 2012 मध्ये चिमणी बांधकामाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांच्या राजकारणाला घरघर लागली तशी चिमणीलाही ग्रहण लागले. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आली अन्‌ काडादी यांचा सख्खा शेजारी पक्‍का वैरी असलेल्या राजकीय नेत्याकडे जिल्ह्याचे राजकीय सूत्र आले. यावेळी काडादींनी "दुश्‍मनों का दुश्‍मन अपना मित्र' म्हणून माजी सहकारमंत्र्यांना हाताशी धरून केंद्रापर्यंत पोहोचले. कारखान्यावर बॅंक लोन करण्यासाठी मदत होईल म्हणून कारखान्याच्या गाळप प्रारंभाप्रसंगी अचानक मोळीचे मानकरी बदलले. खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महाराज, माजी शिखर बॅंकेचे संचालक यांनाही काडादींनी मान दिला. इथेच खरा राजकीय बॉयलर पेटला अन्‌ सख्ख्या शेजाऱ्यांनी काडादींना इंगा दाखविला. सन 2017 मध्ये चिमणी पाडकाम होणार, तितक्‍यात माजी पालकमंत्र्यांना समाजबांधव असलेल्या माजी आमदारांनी कानमंत्र दिला. पक्‍क्‍या वैऱ्यांनीदेखील मनात नसताही जनतेचे तोंड बघून मुख्यमंत्री फडणवीसापर्यंत चिमणीचा धूर पोहोचविला आणि कारवाई मंदावली.

हात नका लावू माझ्या "चिमणी'ला!
पाकची आडकाठी दूर, अफगाणिस्तानात पोहोचणार भारताचा गहू

या घटनेनंतर सोलापूरच्या विकासासाठी धडपड करणाऱ्या चार-चौघांना धक्‍का बसला. त्यांनी खडबडून जागे होत पुन्हा चिमणीला सर्वोच्च न्यायालयात खेचले. दरम्यान, कोरोना, महापालिकेची प्रशासकीय प्रक्रिया यामध्ये चिमणीला दोन वर्ष अभय मिळाले. राज्यातील सत्ता बदलली, पुन्हा मोळीचे मानकरी बदलले. राष्ट्रवादीच्या भावी कार्यकर्त्यांनी गाळप प्रारंभप्रसंगी शिस्तबध्दपणे तांत्रिक मुद्दे मांडत चिमणी कशी अधिकृत आहे, याचे पुरावेच त्यांनी दिली. या स्थानिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे यांच्या मदतीने चिमणी टिकविण्यासाठी काडादींची धडपड सुरू झाली. सध्याची परिस्थिती पाहता चिमणी शेवटची घटका मोजत आहे, तरीदेखील काडादींचा अद्यापही एकच सूर आहे, "हात नका लावू माझ्या चिमणीला'.

मोळीचे मानकरी बदलून कावळ्यांना टपकावले

गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या वादग्रस्त चिमणीच्या प्रवासात धर्मराज काडादी यांनी आपल्या चाणाक्ष राजकीय नितीचा अवलंब करीत चिमणीवर बसलेल्या अनेक कावळ्यांना टपकावले. त्यासाठी सत्तेनुसार त्यांनी आपल्या मोळीचे मानकरी बदलले. कोणी कितीही मोठा व्यक्‍ती असला तरी गाळप प्रारंभाप्रसंगी काडादींचे मोळीचे मानकरी ठरलेले असतात. त्यांनी चिमणीसाठी आपले तत्व बाजूला सारून डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी, माजी सहकारमंत्री, शिखर बॅंकेचे माजी संचालक अन्‌ आता राष्ट्रवादीचे भावी कार्यकर्ते अशा अनेकांना मान दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com