

Solapur Records 43.4°C: Heatwave to Ease with Possible Unseasonal Showers
सोलापूर : सोलापुरात तापमानाचा रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. सलग तीन दिवसांपासून सोलापूरचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविले जात आहे. सोलापुरात १० एप्रिलपासून ते आजपर्यंत रोजच तापमानाचा उच्चांक गाठत आहे. अंगाची लाही-लाही करणारे ऊन दुपारच्या सुमारास पडत असल्याने अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. सध्या वाढलेला तापमानाचा पारा शनिवारपासून (ता. १८) घटण्यास सुरवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.