सोलापूर : स्मार्ट शाळांची सहा कोटींची योजना बारगळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smart School Scheme

सोलापूर : स्मार्ट शाळांची सहा कोटींची योजना बारगळली

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील २८ शाळा आणि नवीन उद्योजकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी १२ कोटींची योजना मंजूर करण्यात आली होती. परंतु इलेक्‍ट्रिक बसच्या टेंडर प्रक्रियेच्या स्थगितीनंतर या दोन योजनांनादेखील कात्री लावत हा निधी इतरत्र वळविण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट शाळा अन्‌ स्मार्ट प्रशिक्षण योजना बारगळली आहे.

सोलापूर शहरासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तब्बल २ हजार १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये शहरातील दोन उड्डाणपूल आणि समांतर जलवाहिनी हे दोन महत्त्वाचे प्रकल्प आहेत. त्यातील १ हजार १०० कोटी रुपये उड्डाणपुलासाठी आणि उर्वरित निधी ही शहरातील श्री सिध्देश्‍वर मंदिर परिसर सुशोभिकरण, स्टेडिअम, होम मैदान, रंगभवन सुशोभिकरण आदींसह रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती आदी शहरातील मुलभूत सुविधांवर खर्च करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. सध्या शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ९६३ कोटींची कामे सुरू आहेत. कोरोनानंतर शहरातील १४ स्मशानभूमी सुशोभिकराणासाठी २२ कोटींची तरतूद स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात आली.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

शहरासह हद्दवाढ भागातील पथदिव्यांसाठी स्मार्ट पोल देण्यात आले. शहरातील रस्ते कामांमध्ये वाढ करण्यात आली. या वाढीव कामांना निधी वर्ग करण्याकरिता मंजूर यादीतील २८ स्मार्ट शाळांचे सहा कोटींचे आणि नवीन उद्योजकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी मंजूर करण्यात आलेले सहा कोटी अशा एकूण बारा कोटी रुपयांच्या या दोन्ही योजना स्मार्ट यादीतून वगळण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

loading image
go to top