
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळ शहर व परिसरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मुर्तिचे विसर्जन सीना नदीवरील कोळेगाव-लांबोटी येथील जुन्या पुलावर केले जाते. या महत्त्वाच्या विसर्जन स्थळाची पाहणी करून बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलीसांना आवश्यक सूचना देण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवार ता 2 रोजी विसर्जन स्थळाला भेट देऊन विसर्जनाच्या वेळी घ्यावयाची दक्षता व प्रशासनाने केलेल्या व्यवस्थे बाबतची माहिती अधिक्षक कुलकर्णी यांनी दिली.