

Solapur Health Department 50 Lakh Spectacles Purchase Under Probe As Work Order Claims Face Official Inquiry
sakal
सोलापूर: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांकडून ५० लाख रुपयांतून चष्मा खरेदी प्रक्रिया राबवली. निविदा प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करून एक दिवस आधी वर्कऑर्डर दिल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी सांगितले पण प्रत्यक्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून चष्मे खरेदीची प्रक्रिया राबवण्यात आली आहे.