

सोलापूर : सोलापुरात गुरुवारी वेगळेच दृश्य पाहायला मिळाले... दुपारी एक वाजताची वेळ...पावसाच्या सरी बरसत होत्या... पण, अशा भर पावसातही दोन हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उभे राहून डीजेमुक्त सोलापूरसाठी एकच हाक देत होते. भावी पिढीचा हा ठाम संदेश; ‘डीजेमुक्त सोलापूर हाच पर्याय’ असल्याची जाणीव करून देत होता. ‘कर्णकर्कश डीजे बंद करा’, ‘सोलापूर १०० टक्के डीजेमुक्त झालेच पाहिजे’, अशा घोषणांनी सात रस्ता परिसर, रंगभवन चौक, आंबेडकर चौक, चार हुतात्मा चौक परिसर दणाणून गेला होता.