Solapur : विद्यार्थ्यांना १५ दिवसांत मिळणार प्रवेशाचे दाखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

students

सोलापूर : विद्यार्थ्यांना १५ दिवसांत मिळणार प्रवेशाचे दाखले

सोलापूर : दहावी-बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप केले जात आहे. त्यानुसार विद्यार्थी विविध महाविद्यालयांसह आयटीआय, कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करीत आहेत. पण, प्रवेश निश्चितीपूर्वी त्यांना उत्पन्न, जात, रहिवासी, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी अशा दाखल्यांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज केल्यास त्यांना अवघ्या १५ दिवसांत दाखले वितरीत केले जाणार आहेत.

जातीचा दाखला, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी प्रतिज्ञापत्र तसेच उत्पन्न व रहिवासी दाखल्यासाठी स्वघोषणापत्र द्यावे लागते. महा-ई-सेवा केंद्रातूनही विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. शेतकरी किंवा डोंगरी असल्याच्या प्रमाणपत्रासाठी त्या विद्यार्थ्याकडे पालकाचा शेतीचा सातबारा, आठ-अ उतारा, रेशनकार्ड, आधार कार्ड, पीकपाणी उतारा व स्वघोषणापत्र द्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने दाखले देण्याची प्रक्रिया सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्हा प्रशासनानेही सर्व तहसीलदारांना तशा सूचना केल्या आहेत, जेणेकरून कागदपत्रांअभावी कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही, अशी स्थिती उद्‌भवणार नाही.

महा-ई-सेवा केंद्रातून करा अर्ज

विद्यार्थ्यांना सेतू किंवा तहसील

उत्पन्न दाखला

(लागणारी कागदपत्रे)

रेशन कार्ड

आधार कार्ड

तलाठी दाखला

(४-५ दिवसांत मिळतो)

रहिवासी दाखला

(आवश्यक कागदपत्रे)

शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड

आधार कार्ड

रेशनकार्ड

स्वघोषणापत्र

असल्यास मतदान कार्ड

(४ ते ५ दिवसांत मिळतो)

जातीचा दाखला (लागणारी कागदपत्रे)

शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड आधार कार्ड

रेशनकार्ड मतदान कार्ड ‘ओबीसी’साठी १९६७ पूर्वीचा जात पुरावा

‘एसबीसी’साठी १९६७ पूर्वीचा जात पुरावा

व्हीजे व एनटीसाठी १९६१ पूर्वीचा जात पुरावा

एसटी, एससीसाठी १९५० पूर्वीचा जात पुरावा

(१५ ते २१ दिवसांत मिळतो)

Web Title: Solapur Students Will Get Admission Certificates In 15 Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..