Solapur : यंदाच्या गळीतापुर्वी मागील संचालक मंडळाची FRP ची रक्कम अदा ;शिवानंद पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Sugar Factory

Solapur : यंदाच्या गळीतापुर्वी मागील संचालक मंडळाची FRP ची रक्कम अदा ;शिवानंद पाटील

मंगळवेढा :- श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामात गळीतास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकय्राच्या एफ आर पी ची उर्वरित रक्कम प्रति टन रु 110.89 प्रमाणे 4 कोटी 27 लाख उत्पादकांच्या धनश्री महिला पतसंस्थेच्या सर्व शाखेतील खात्यावर दिवाळीपुर्वी वर्ग करत यंदाचा हंगाम सुरु करण्यापुर्वी राहिलेली एफ आर पी रक्कम देण्याबाबत दिलेला शब्द पुर्ण केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.

नव्या संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली सुरु होणाय्रा गळीत हंगामाच्या मोळी पुजनप्रसंगी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी एफ आर पी रकम अदा करण्याबाबत माजी आमदार प्रशांत परिचारक,भगीरथ भालके,धनश्री पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजी काळुंगे,रतनचंद शहा बॅकचे राहूल शहा,बळीराजाचे दामोदर देशमुख,जिजामाताचे रामकृष्ण नागणे,अ‍ॅड नंदकुमार पवार,यांच्या मागदर्शनाखाली शब्द दिला होता.

त्याप्रमाणे शब्द खरा केला.तर सभासदासाठी साखर वाटपही दिवाळीपुर्वी युटोपियन व सिताराम कारखान्याच्या मदतीने सुरु करण्यात आले कारखान्यावरील सत्ताबदलानंतर विद्यमान संचालक मंडळाने मागील हंगाम अखेरचे कालावधीतील कार्यक्षेत्रातील सभासद व कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन शेतकय्राचे यांचे संपुर्ण ऊसाचे बिल प्रतिटन 2100 प्रमाणे एकूण रक्कम रुपये 8 कोटी 75 लाख धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा व पतसंस्थेच्या सर्व शाखामध्ये यापुर्वीच वर्ग केले.

मागील गळीत हंगामाचे उर्वरित ऊस तोडणी वाहतुक फायनल बिल रु 1 कोटी 64 लाख 32 हजार 470 यापुर्वी जिजामाता महिला पतसंस्था, मंगळवेढा येथे संबंधीत ठेकेदारांचे खात्यावर जमा करण्यात आले.

अशा प्रकारे मागील संचालक मंडळाचे काळात गळीतास आलेल्या ऊसाचे बिलापोटी यापुर्वी रु  2100 प्रमाणे राहिलेली बिले अदा केली आहेत  तसेच एफ आर पी पूर्ण करण्यासाठी उर्वरित ऊस बिल रु 4 कोटी 27 कोटी शेतकय्रांच्या धनश्री पतसंस्थेतील बँक खात्यावर वर्ग केल्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात यांनी सांगीतले. सध्या सर्वत्र मोठया प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वच कारखान्यांचा हंगाम सुरु करणेस विलंब होत आहे.

अशा परिस्थितीत आपले कारखान्याची ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सध्या कारखाना साईटवर आली असुन शेती विभागामार्फत ऊसतोडणी प्रोगाम तयार केला ऊसतोडणीच्या शेजा देण्यात आल्या आहेत तसेच कारखाना गळीतासाठी तयार असुन उद्यापासुन पुर्ण क्षमतेने नॉनस्टॉप कारखाना चालु करणार आहोत.

या हंगामामध्ये 6 लाख मे टन गाळपाचे संचालक मंडळाने उध्दीष्ट ठेवलेले आहे  मा संचालक मंडळाने ठेवलेले उध्दीष्ट पुर्ण करण्यासाठी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख,कर्मचारी उत्सुक असलेचे कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी सांगीतले.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक श्री प्रकाश पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर,  ऊस उत्पादक सभासद-शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार, सिझन कामाचे कंत्राटदार, कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurSugar Factory