

Rising costs and export disruptions hit Solapur’s textile industry, causing massive financial losses.
sakal
-प्रकाश सनपूरकर
सोलापूर: युद्धामुळे थांबलेली निर्यात, देशांतर्गत बाजारातील घटलेली मागणी, शिपमेंटचे पाच पटीने वाढलेले चार्जेस, कच्च्या मालाची प्रचंड महागाई या प्रकाराने सोलापूरच्या वस्त्रोद्योगास अंदाजे ५०० ते ७०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. युद्ध पंधरवड्यापेक्षा अधिक लांबल्याने वस्त्रोद्योगावर देखील वाईट स्थिती आली आहे. याचा थेट परिणाम कामगारांच्या रोजगारावर होण्याची भीती आहे.