
सोलापूर : स्मार्ट सिटीत कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा कोंडाळे साचू नये तसेच नागरिकांना कचरा टाकणे सुलभ व्हावे अशी दुहेरी सोय साधत शहरात ठिकठिकाणी तीन हजार डस्टबीन लावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.