
सोलापूर : येथील आरपात नगरातील गोविंद कुटुंबीयाने घराच्या छतावर एक हजार लिटर पाण्याची टाकी ठेवली होती. २४ जून रोजी ती टाकी शेजारील कुटुंबाच्या पत्र्यावर कोसळली आणि त्यात घरातील २० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. यात त्या विवाहितेच्या कुटुंबीयाने फिर्याद द्यायला नकार दिल्याने पोलिसांनी स्वत: चौकशीअंती अर्चना बालाजी गोविंद (रा. आरपात नगर, अक्कलकोट एमआयडीसी परिसर, सोलापूर) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.