Railway Project: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर-तुळजापूर-धाराशिव मार्गासाठी २४० कोटी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Solapur Tuljapur Dharashiv Railway Line Gets 240 Crore Boost: सोलापूर-तुळजापूर-धाराशिव नवीन रेल्वे मार्गाला राज्य सरकारकडून पुन्हा आर्थिक चालना; २०२६-२७ साठी २४० कोटींची तरतूद, ग्रामीण भागातील संपर्काला वेग
Railway Project

Railway Project

sakal 

Updated on

सोलापूर : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद (धाराशिव) या बहुप्रतीक्षित नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला राज्य शासनाने पुन्हा आर्थिक बळ दिले आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाच्या हिश्श्यातील २४० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यापूर्वी या प्रकल्पासाठी ३४० कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, नव्या मंजुरीमुळे राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला आणखी गती मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com