Solapur : दोन गावांना स्वतंत्र सज्जा व तलाठीचा प्रस्ताव प्रलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायतची

Solapur : दोन गावांना स्वतंत्र सज्जा व तलाठीचा प्रस्ताव प्रलंबित

मंगळवेढा : शहरानजीक संत चोखामेळा नगर व संत दामाजी नगर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत करून आठ वर्षे झाली तरी यासाठी स्वतंत्र तलाठी सज्जा अस्तित्वात नसल्यामुळे शेतकरी वर्गांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतची निर्मिती करणाऱ्या शासनाने आठ वर्षानंतरही तलाठी सज्जेचा प्रश्न मात्र रेंगाळत ठेवला.

या भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन चोखामेळानगर व दामाजी नगर या स्वतंत्र ग्रामपंचायती तत्कालीन आ.स्व.भारत भालके यांनी अस्तित्वात आणल्या. या ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर स्वतंत्र ग्रामसेवक देत कारभार स्वतंत्रपणे सुरू झाला. सुरुवातीला काही काळ प्रशासक कार्यरत होते व त्यानंतर दोन पंचवार्षिक निवडणुका देखील पार पडल्या मात्र या भागातील असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा हे मंगळवेढा हद्दीतून निघत आहेत मात्र त्यांना स्वतंत्र तलाठी सज्जे अस्तित्वात आलेले नाहीत.

शिवाय सातबाराचे विभागणी देखील करण्यात आली नाही मंगळवेढा शहरांमध्ये जवळपास 11 हजार 175 हजार कृषक व 4 हजाराच्या आसपास अकर्षक खातेदार आहेत सध्या हे उतारे मंगळवेढयातून निघत असून या शहरातील तलाठ्यावर या कामाचा अतिरिक भार पडत आहे मात्र यात स्वतंत्र सज्जाची विभागणी केल्यानंतर दामाजी नगर व चोखामे नगर या भागात सातबारा विलगीकरण केले तर शहरांमध्ये जवळपास कमी खातेदार शेतकरी संख्या कमी राहणार आहे.

त्यामुळे या दोन ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र सज्जा झाल्यानंतर नवीन पद भरतीत ठिकाणी स्वतंत्र तलाठी कामकाज करण्यासाठी मिळणार आहे व या ग्रामपंचायत हद्दीतील बाकी गुंठेवारी व ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीस मदत मिळणार आहे शिवाय स्वतंत्र सातबारा निघाल्यामुळे शासकीय लाभासाठी देखील अधिक सोयीचे होणार आहे

त्या दृष्टीने तात्काळ स्वतंत्र तलाठी सज्ज्याची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे मात्र गेली आठ वर्षापासून स्वतंत्र ग्रामपंचायती केल्या मात्र स्वतंत्र सज्जाचा प्रश्न मात्र शासकीय पातळीवर रेंगाळला आहे. महसूल खात्याकडून भूमी अभिलेख कार्यालयाकडे सातबाराच्या विलगीकरणासाठीचा आकृतीबंध तयार करण्याची साठी पत्र व्यवहार केला. मात्र भूमी अभिलेख कार्यालयाकडून सातबाराचे विलगीकरण केले नसल्यामुळे हा प्रश्न सातत्याने रेंगाळत चालला आहे.

दामाजी नगर हा मोठा प्रभाग असल्यामुळे या भागातील सात स्वतंत्र सातबारा आणि स्वतंत्र तलाठी देण्याबाबतची आपण मागणी केली आहे परंतु अद्याप यामध्ये सकारात्मक निर्णय झालेला नाही. हा निर्णय झाल्यास ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात देखील भर पडणार आहे जमीर सुतार सरपंच दामाजी नगर

शहरा नजीकच्या दोन मोठ्या ग्रामपंचायतसाठी स्वतंत्र तलाठी व स्वतंत्र सातबारा दिल्यास या भागातील शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेणे सुलभ होईल.त्या दृष्टीने तात्काळ याची अंमलबजावणी करावी.

राजाभाऊ चेळेकर शहराध्यक्ष काँग्रेस.

ग्रामपंचायत प्रमाणे स्वतंत्र तलाठी व सज्जा निर्मिती करण्यासाठी लक्ष घालून ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या मागणीची पुर्तता करू.

आ.समाधान आवताडे पंढरपूर मंगळवेढा