
सोलापुरातील तीनशे पारधी कुटुंबांचे हाल
सोलापूर: सोलापूर शहात तीनशेहून अधिक पारधी कुटुंबांचा अत्यंत गलिच्छ वस्तीत रहिवास असून या कुटुंबातील केवळ साठ जणांकडेच रेशनकार्ड असून इतर सर्व कुटुंबे अद्यापही मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. या परिसरात सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे हा परिसर अंत्यत गलिच्छ झाला आहे.
ग्रामीण भागातील पारधी समाजाला जिल्हा परिषदेकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. बचत गटांकडून अर्थसहाय्य, घरकुल योजनेतून घरे याचे लाभ ग्रामीण भागात मिळतात. मात्र, शहरात राहणाऱ्या पारधी समाजाला या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. २८ एप्रिल रोजी आदिवासी पारधी समाज परिवर्तन संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले होते. यानंतर गुरुवारी उमेद व इतर योजनांचा लाभ या कुटुंबांना देता यावा, यासाठी गुरुवार (ता.५) रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठाच्या पाठीमागे चैतन्य भाजी मंडइशेजारी अनेक पारधी कुटुंबे ग्रामीण भागातून स्थलांतरीत झाली आहेत. मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणी राहणाऱ्या या समाजातील काही कुटुंबांकडे मतदानकार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड नाही. यामुळे कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. शिक्षणांचा आभाव, व्यसनाधिनता यामुळे हा समाज अंत्यत मागास अवस्थेत जीवन जगत आहेत.
सांडपाणी सोडल्याने वस्ती झाली गलिच्छ
पारधी कुटुंबे रहणाऱ्या या परिसरात ना विजेच्या दिव्यांची सोय आहे. ना पिण्याच्या पाण्यची. याच परिसरतील वातावरण प्रचंड गलिच्छ अवस्थेत आहे. अशातच या परिसरात ड्रेनेजचे पाणी सोडल्याने या परिसराला नाल्याचे रुप आले आहे. या परिसरातील समाज हा शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या अत्यंत मागास आहे. अंधश्रद्धेमुळे कुटुंबनियाजन न करणे, वैद्यकीय उपचाराचा अभाव यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या येथे आहेत.
Web Title: Solapur Unhygienic Slum Behind
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..