esakal | Solapur: पालकमंत्र्यांना विद्यापीठाचे पत्र! तरीही मिळेना अहिल्यादेवींच्या अध्यासन केंद्राला निधी
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : अहिल्यादेवी अध्यासन केंद्राला मिळेना निधी

सोलापूर : तरीही मिळेना अहिल्यादेवींच्या अध्यासन केंद्राला निधी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील त्यांच्या अध्यासन केंद्रासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २० लाखांचा निधी मिळावा, असे पत्र विद्यापीठाने पाठविल्याची माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. मात्र, ना जिल्हा नियोजन समितीकडून ना आमदार, खासदार निधीतून त्यासाठी पैसे मिळाले. आता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर विद्यापीठात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या नावे अध्यासन केंद्र उभारण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यासाठी किती निधी लागणार, मनुष्यबळ किती असावे, याबाबतचा विद्यापीठाने पाठविलेला प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. पहिल्या टप्प्यातील काम होण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीकडून काही निधी मिळावा, अशी अपेक्षा विद्यापीठाने पत्रातून व्यक्‍त केली आहे. ते पत्र पाठवूनही आता चार-सहा महिन्यांचा कालावधी लोटल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, निधी देण्यासंदर्भात अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या अध्यासन केंद्रासाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा विद्यापीठाला आहे. त्या निधीतून अहिल्यादेवींच्या साहित्यावर संशोधन करणे सोयीचे होईल, असेही सांगण्यात आले.

हेही वाचा: सोलापूर : जवाहर नवोदय विद्यालयात सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

महापालिकेकडून काहीच मदत नाही

शहरातील विविध प्रश्‍नांवर विद्यापीठाच्या माध्यामातून संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी काही महापालिकांकडून विद्यापीठांना निधीही दिला जातो. मात्र, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व महापालिका प्रशासन तथा सत्ताधाऱ्यांमध्ये अजूनही ते विद्यापीठ आपले आहे, अशी भावना रूजलेली दिसत नाही. महापालिकेकडून मदत व सहकार्याची अपेक्षा विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे.

अहिल्यादेवींचे स्मारक आश्‍वारुढ की कसे?

विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह त्याठिकाणी भेट देणाऱ्यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या स्मारकापासून प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतंत्र समिती नियुक्‍त केली आहे. स्मारकासाठी निधीची घोषणादेखील झाली, परंतु अजूनपर्यंत निधी मिळालेला नाही. दरम्यान, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचा पुतळा आश्‍वारुढ उभारला जाणार की साधा असणार, याबाबत अजूनही स्पष्टता झालेली नाही.

loading image
go to top