

Solapur University Takes Major Decision for Drought Affected Farmers to Grow Maize on 100 Acres and Provide Free Cattle Fodder
sakal
सोलापूर : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. पाण्याअभावी जानेवारीपासून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पुढाकार घेत १०० एकरांवर मका पेरणीचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरमध्ये पेरलेला मका मार्चमध्ये शेतकऱ्यांना चारा म्हणून उपलब्ध होणार आहे.