Solapur University : कौशल्य विकासाच्या कोर्सचा पॅटर्न पोचला जगभर

समाजाच्या विकासाची जीवनवाहिनी म्हणून सोलापूर विद्यापीठाचा कौशल्य विकासाच्या कोर्सचा पॅटर्न जगभर पोचला आहे.
Solapur University
Solapur Universitysakal
Summary

समाजाच्या विकासाची जीवनवाहिनी म्हणून सोलापूर विद्यापीठाचा कौशल्य विकासाच्या कोर्सचा पॅटर्न जगभर पोचला आहे.

सोलापूर - कौटुंबिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही, अशा तरुण-तरुणींना कौशल्याच्या बळावर चांगल्या पगारावर जॉब मिळावा, या हेतूने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने २०१८ पासून स्थानिक गरजा ओळखून कौशल्य विकासाचे कोर्स सुरु केले. सद्य:स्थितीत १४२ कोर्स सुरु असून दरवर्षी प्रवेश हाऊसफुल्ल होतात. सात हजार जणांनी कौशल्याचे प्रशिक्षण घेतले असून त्यातील ८० टक्के तरुण-तरुणी जॉबला लागले आहेत, हे विशेष.

समाजाच्या विकासाची जीवनवाहिनी म्हणून सोलापूर विद्यापीठाचा कौशल्य विकासाच्या कोर्सचा पॅटर्न जगभर पोचला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील कुलगुरूंचे कौतुक करीत हा पॅटर्न राज्यभर लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष बाब म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तेच अभिप्रेत असून कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठात पाच वर्षांपूर्वीच ते कोर्स सुरु केले आहेत. स्थानिक उद्योजक, व्यावसायिकांना कुशल मनुष्यबळ मिळत नाही. त्याचा अभ्यास करून विद्यापीठाने त्यादृष्टिने कोर्स तयार करून तज्ज्ञ प्राध्यापक तथा प्रशिक्षकांच्या माध्यमातून त्याची सुरवात केली.

रोजगार निर्मितीला नीतिमत्तेची सांगड घालून हे कोर्स शिकवले जात आहेत. आतापर्यंत कोर्स पूर्ण केलेल्यांपैकी २५ टक्के लोकांनी स्वयंरोजगार सुरु केले आहेत. साधारणतः: ४१ टक्के तरुण-तरुणी खासगी जॉब करीत असून पाच टक्के सरकारी सेवेत गेले आहेत. आठ टक्के लोक घरबसल्या चांगली कमाई करीत आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना स्वतंत्र दिक्षांत समारंभ घेऊन प्रमाणपत्राचे वितरण केले जाते. विद्यापीठातील कौशल्य विकासांतर्गत काही कोर्सचे प्रवेश मेरिट यादी लावून द्यावे लागतात, एवढा प्रतिसाद मिळू लागला आहे.

‘या’ कोर्समधून हमखास जॉबची संधी

मॉन्टेसरी टिचर, ब्युटिशियन, फॅशन डिझायनिंग, स्पोकन इंग्लिश, हेल्थ असिस्टंट, योगा टिचर, डायलेसिस व सिटीस्कॅन टेक्निशियन, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, शेअर मार्केट, टॅली- ईआरपी ॲण्ड जीएसटी, पायथॉन, हॅडूप, टीव्ही ॲंकरिंग, डिजिटल जर्नालिझम, डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग, हिस्टॉरिकल टुरिझम ॲण्ड मॅनेजमेंट, ॲग्रो टुरिझम.

स्थानिक गरजा ओळखून विद्यापीठात कौशल्य विकासाचे १४२ कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. तीन, सहा महिने व एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेल्यांपैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार तेच अभिप्रेत आहे. आपण आपल्या विद्यापीठात २०१८ पासूनच कौशल्य विकासाचे कोर्स सुरू केले आहेत.

- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com