
सोलापूर : वटपौर्णिमेनिमित्त दिलीपनगरात वडाचे रोपण
सोलापूर : हत्तुरेवस्ती ते कुमठा रोड या मार्गावर असलेल्या जम्मा वस्तीसमोरील दिलीप नगरात वटपौर्णिमेचे औचित्य साधून ‘सकाळ’तर्फे वडाच्या रोपांचे रोपण करण्यात आले. वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाचे पूजन करण्यात येते. पर्यावरण साखळीत वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसेच भारतीय संस्कृतीत या वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहे. उन्हाळ्यात जेव्हा कोणत्याही झाडांना फळे नसतात तसेच शिवारात पिके नसतात या काळात वडाच्या व पिंपळाच्या झाडांना फळे येतात. उन्हाळ्याच्या दिवसांत हीच फळे खाऊन पक्षी आपली गुजराण करतात. अनेक औषधी गुणधर्मांचा भांडार असलेला हा वृक्ष पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.
पर्यावरण जागृतीसाठी नागरिकांना प्रोत्साहन देत ‘सकाळ’ परिवाराने लोकसहभागातून वृक्ष लागवड उपक्रम राबविला. मंगळवारी (ता. १४) वटपौर्णिमेच्या निमित्ताने दिलीपनगर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन वृक्ष लागवड करण्यात सोलापूर : वटपौर्णिमेनिमित्त मंगळवारी वडाच्या रोपट्याच्या लागवडप्रसंगी संजीव जम्मा, सतीश जम्मा, रोहन आदमाने, प्रदीप तडकल, राजेंद्र बागडे, अनिल उपरे, विशाल सुरवसे, अभिषेक दळवी, श्रीकांत कोकणे, सुधीरसिंग बायस, डॉ. एस. पडळकर, अजय धाराशिवकर, अभयकुमार सुपाते आदी.
Web Title: Solapur Vatpoornime Vada Planting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..