esakal | Solapur: बेवारस ४५४ वाहनांचा भंगारात होणार लिलाव
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : बेवारस ४५४ वाहनांचा भंगारात होणार लिलाव

सोलापूर : बेवारस ४५४ वाहनांचा भंगारात होणार लिलाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पोलिस कारवाईत जप्त केलेली, बेवारस, बिनधनी दुचाकींचा स्क्रॅप भंगार म्हणून लिवाव केला जाणार आहे. १२ ऑक्‍टोबरला सकाळी ११ वाजता राखीव पोलिस निरीक्षक पोलिस मुख्यालयात (सोलापूर ग्रामीण) याठिकाणी होणार आहे. त्यामध्ये एकूण ४५४ वाहनांचा समावेश असून त्याची शासकीय किंमत १२ लाख ९१ हजार ४०० रुपये एवढी आहे.

त्यामध्ये सोलापूर तालुका (२०), मोहोळ (५१), मंद्रूप (२), कामती (१७), वळसंग (६८), अक्‍कलकोट दक्षिण (१२), अक्‍कलकोट उत्तर (६), बार्शी शहर (२), वैराग (४), पांगरी (१७), माढा (१६), कुर्डूवाडी (१८), टेंभूर्णी (१७), करमाळा (१८), पंढरपूर तालुका (१३), पंढरपूर शहर (९), पंढरपूर ग्रामीण (३०), करकंब (१०), मंगळवेढा (४१), सांगोला (३०), अकलूज (९), माळशिरस (३१), वेळापूर (३) आणि नातेपुते पोलिस ठाण्यातील दहा वाहनांचा समावेश आहे.

loading image
go to top