Solapur : गावच्या विकासात लोकांचा सहभाग महत्त्वाचा ; भास्कर पेरे पाटील

तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे बोलत होते.
माजी सरपंच भास्कर पेरे पाटील
माजी सरपंच भास्कर पेरे पाटीलsakal

मंगळवेढा : देशात असंख्य ग्रामपंचायती असताना पाटोदा, हिवरे बाजार, आणि राळेगणसिद्धी हे तीनच गावे आदर्श होतात,म्हणून ग्रामपंचायतचा कारभार करताना काल काय झालं यापेक्षा भविष्यात गावाच्या विकासासाठी काय करायचं याचे नियोजन करताना लोकांचा सहभागही महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आदर्श गाव पाटोद्याचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे बोलत होते.अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्धेश्वर गायकवाड हे होते. यावेळी प्राध्यापक अशोक पाटील,मधुकर भंडगे, पांडुरंग चौगुले, लक्ष्मण गायकवाड, चारुदत्त पाटील, श्रीकांत निकम, सत्यवान कोडग, सिताराम भगरे,तुळशीराम खिलारे,विष्ण भंडगे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले की,पुढच्या पिढीसाठी काय पेरायचं हे गावकऱ्यांनी ठरवायचे आहे.

गावगाड्यात काम करत असताना ग्रामपंचायतीच्या प्रमुखांनी गावातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी, वृक्ष लागवड ,स्वच्छता, मुलांचे शिक्षण, वयोवृद्धाची देखभाल गोष्टीला प्राधान्य देण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज चारशे वर्षांपूर्वी शौचालय वापरत होते. आणि आता शौचालय वापरा म्हणून सांगून सरकारला अनुदान देण्याची वेळ आली तरी देखील लोकांचा शौचालयाचा वापर कमी असल्याची खंत व्यक्त केले.

समाजाला दिशा देणाऱ्या मंडळींमध्ये चुकीची लोकं लोक घुसल्यामुळे ते चुकीचे संदेश देत राहिले आणि समाज त्यांच्याच मागे धावल्यामुळे समाजाची प्रगती होण्याऐवजी अधोगती होत राहिली. ग्रामीण भागाच्या विकासाची दिशा असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मटणावर आणि पैशावर मतदान न करता,

योग्य दिशा देणाऱ्यांना संधी. द्यावीत,कोरोनाच्या संकटामध्ये ऑक्सिजनचे महत्त्व सगळ्यांना माहीत झाल्यामुळे ऑक्सिजन देणारी झाडे लावावीत त्यामुळे पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यामुळे गावकऱ्याचे शारीरिक आरोग्य चांगले राहते. ग्रामीण भागातील समस्यांची सर्वाधिक झळ ही महिलांना बसते.म्हणून

गावाच्या विकासासाठी पुरुषाबरोबर महिलांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे प्रास्ताविक पांडुरंग चौगुले यांनी केले सूत्रसंचालन सतीश पाटील यांनी तर आभार लक्ष्मण गायकवाड यांनी मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com