

Residents in Solapur coping with rising temperatures as the minimum temperature records a sharp increase within days.
Sakal
सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी उद्या (गुरुवार, ता. १६) मतदान होत आहे. जिल्हा परिषदेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना सोलापूरच्या हवामानात चार दिवसांत कमाल व किमान तापमानाचा पारा वाढला आहे. अवघ्या चारच दिवसांत सोलापूरच्या वातावरणात कमालीचा बदल झाल्याचे जाणवत आहे.