

Solapur Weather Update.
Sakal
सोलापूर: सोलापूर शहर व परिसरातील थंडी दोन दिवसांपासून ओसरू लागली आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने सोलापूर व परिसरात थंडी कमी कमी होताना जाणवत आहे. सध्या वाढत असलेले किमान तापमान मंगळवारपर्यंत (ता. १८) असेच वाढत राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे पुढील काही दिवसांत वातावरणातील थंडी गायब होईल, अशीच शक्यता आहे.