
सोलापूर: सलग दुसऱ्या दिवशी हिप्परगा तलाव तुडूंब भरून वाहत आहे. गुरुवारी उजव्या व डाव्या कालव्यातील पाण्याचा प्रवाह मंदावला असून तो ६०० वरून ३५० ते ४०० क्युसेक करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील आदिला नदी आणि शेळगी नाल्याला आलेला पूर थोड्याफार प्रमाणात ओसरला होता.