

Solapur Woman Files Complaint After Marital Harassment Allegations Case Filed Against Husband and Three In Laws
sakal
सोलापूर : विवाहानंतर १५ दिवसांनीच सासरच्यांनी माहेरहून पैसे, महागड्या वस्तू आण म्हणून तगादा सुरू केला. ‘माहेरच्यांकडून चार एकर जमीन नावे कर’ म्हणूनही छळ केला. त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहिता अश्विनी मंदार गायकवाड (रा. जुळे सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. यावरून सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यासह पती, सासू व मावस सासूवर गुन्हा दाखल झाला आहे.