

Solapur Marital Harassment Case Woman Allegedly Pressured Over Childbirth and Rs 40 Lakh Demand Seven Booked
sakal
सोलापूर : ‘तू मुलाला जन्म देऊ शकत नाहीस, माझे घर सोडून जा, तुझ्या माहेरहून ४० लाख घेऊन ये, ’ असे म्हणून सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. ‘पत्नीला घटस्फोट दे, दुसरा विवाह करू, मूलबाळ होत नसल्याने तिच्यावर किती खर्च करतो, तो खर्च बंद कर, ’ असे म्हणून सासरच्यांनी पतीला माझ्याविरोधात भडकावले. या प्रकरणी विवाहिता प्रतिमा नितीन कुंटे (रा. दक्षिण कसबा, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.