
Solapur Literary Community : मागच्या २३ वर्षांपासून दर पंधरा दिवसाला एकदा सगळ्या समूहाची एकत्र भेट, सोळा महिला सदस्यांनी खरेदी केलेली आणि वाचलेली ७३६ पुस्तके, कवी दत्ता हलसगीकरांपासून डॉ. गो. मा. पवारांपर्यंत अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून केलेला संवाद हे आहे सोलापूरच्या अभिरुची बुक क्लबचे वैशिष्ट्य ! स्थापनेपासून म्हणजे अगदी २००२ पासून या क्लबमधील सदस्यांची ‘अभिरुची’ वाढवण्याचे आणि घडवण्याचे काम वैशाली देगावकर आणि निवेदिका मंजूषा गाडगीळ करत आहेत.