Solapur News : सिटी बसअभावी विद्यार्थिनींची गैरसोय; अवैध वाहतुकीतून सुरक्षितता धोक्यात

हद्दवाढ भागातून येण्यासाठी अडचण
st employee did not get salary msrtc high court marathi news mumbai
st employee did not get salary msrtc high court marathi news mumbaiSakal

- मोनिका शिंदे

Solapur News : सोलापूर शहरातील विविध भागासह वळसंग, कुंभारी, घरकुल, सैफुल या भागातून केगाव, बाळे, शिवाजीनगर या भागाकडे तसेच विद्यापीठ, सिंहगड महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मुलींची, विद्यार्थिनींची सिटी बस नसल्याने गैरसोय होत आहे.

बस नसल्याने त्यांना रिक्षाने प्रवास करावा लागतो. मात्र क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये बसविल्याने अपघाताची शक्यता वाढते. शिवाय रिक्षाची अवाजवी होणारी भाडेवाढ यामुळे विद्यार्थिनींची आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

शिक्षणासाठी बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त आहे. शिक्षण व इंटरनॅशनल कोर्सेसकडे मुलींचा कल वाढतो आहे. त्यासाठी मुली जुळे सोलापूर, हद्दवाढ भागात कोणा नातेवाइकांकडे, वा भाड्याने रूम करून राहतात.

शिवाय होस्टेलवर राहणाऱ्या मुलीही आहेत. यांना रोज ये-जा कॉलेजला वा कोणत्या कामासाठी प्रवास करावा लागतो. मात्र सिटी बसची संख्या कमी असल्याने व काही भागात सिटी बसची सोय नसल्याने मुलींची गैरसोय होत आहे.

त्यांना शहरात फिरणाऱ्या रिक्षांमधूनच प्रवास करावा लागतो. मात्र या रिक्षाचालकांची मनमानी व बेशिस्त वर्तनामुळे हा प्रवास असुरक्षित बनला आहे. सोलापूर शहरात बोटावर मोजण्याइतक्या सिटी बस सुरू आहेत. शिवाय एस.व्ही.सी. एस. कॉलेज, वालचंद कॉलेज, दयानंद कॉलेज तसेच केगाव येथील सोलापूर विद्यापीठ अशा ठिकाणी विविध सिटी बस अपुऱ्या पडतात. या भागातील रिक्षांमध्ये प्रवास करणे मुलींच्या दृष्टीने असुरक्षित आहे.

त्यांचे वर्तन बऱ्याचदा असभ्य असते. रिक्षा चालक दुप्पट भाडे मागतात, कधी कधी अर्ध्या मार्गावरच उतरून देतात. यामुळे बाहेरगावहून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींची मोठी अडचण होते. जर शहरात पुरेशा सिटी बस उपलब्ध असतील आणि त्या वेळेत जर धावल्या तर असे प्रश्‍न उपस्थित होणार नाहीत.

एका रिक्षात रिक्षा ड्रायव्हरला सोडून अकरा प्रवाशांना बसवतात. जास्तीचे पैसे देऊनसुद्धा रिक्षामध्ये जागा नसते आणि सगळ्यांना ॲडजेस्ट करून बसवले जाते. अर्धा एक तास भरेपर्यंत रिक्षा हलत नाही. त्यामुळे वेळेचे नुकसान होते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खूप उशीर होतो.

- प्रीती धनुरे, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

आम्ही रिक्षाने जाता असताना खूप त्रास होतो, बस बंद असल्याने रिक्षाला पैसे खूप जातात. कॉलेजला जायला खूप उशीर होतो, बस नसल्याने येण्या-जाण्यास सोय होत नाही. यामुळे मुलींची सुरक्षा धोक्यात येते आणि आई-वडिलांची चिंता वाढते.

- समीक्षा कावळे, एस.व्ही.सी.एस कॉलेज, सोलापूर

मी होस्टेलला राहून शिक्षण घेते. सिटी बसची सोय नसल्याने रिक्षाने प्रवास करावा लागतो. परंतु रिक्षा चालकांना जास्त पैसे द्यावे लागतात. हॉस्टेलवर राहत असल्याने कधी कधी पैसे कमी पडल्याने चालत कॉलेजला जावे लागते. सिटी बस सुरू झाली तर जाण्या-येण्याचा खर्च कमी होतो.

- साक्षी खराडे, दयानंद कॉलेज, सोलापूर

st employee did not get salary msrtc high court marathi news mumbai
Solapur News : निकृष्ट कामाचा नागरिकांकडूनच पंचनामा; चोखामेळा व सप्तशृंगी नगरमधील रहिवाशांकडून लेखी तक्रार

सैफुलवरून पॉलिटेक्निक कॉलेजला शिक्षणासाठी यावे लागते. सैफुल ते रंगभवन आणि रंगभवन टू पॉलिटेक्निक कॉलेज असे दोन रिक्षा बदलावे लागते. माझे वडील सोडायला येतात. सिटी बस असेल तर आम्हालाही कमी खर्चात प्रवास होईल.

- तान्या बेंजरपे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, सोलापूर.

रिक्षांमध्ये आठ ते दहा जण बसतात. वेगळी रिक्षा करून जाणे परवडत नसल्याने, सीटवरील रिक्षांनी कॉलेजला यावे लागते. सीटवरील रिक्षावाले पण रिक्षा भरेपर्यंत थांबतात. यामुळे कॉलेजला येण्यासाठी वेळ होतो.

- शर्वरी म्हेत्रे, वालचंद कॉलेज सोलापूर.

कॉलेजला गावाकडून येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी बस नसल्याने गैरसोय होते. प्रत्येकाकडे वाहने नसतात व दुसऱ्या वाहनांचे चार्जेस जास्त असतात. यामुळे सिटी बस नसल्याने गैरसोय होत आहे.

- डॉ.पार्वती शेटे, दयानंद कॉलेज, प्रोफेसर, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com