Yamai Devi Temple in Solapur
esakal
उ.सोलापूर : शंभर रुपयांच्या दक्षिणेचा धनी कोण? या वादातून दोन पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मार्डी (ता. दक्षिण सोलापूर) येथील यमाईदेवी मंदिरात (Yamai Devi Temple) गुरुवारी (ता. २५) घडली. भक्ताने दिलेली दक्षिणा दानपेटीत का टाकली म्हणून एका पुजाऱ्याने दुसऱ्या पुजाऱ्याला गाभाऱ्यातच ठोसे लगावले. ऐन नवरात्रोत्सवात (Navratri Festival) झालेल्या प्रकाराबद्दल उपस्थित भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.