सोलापूर : शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग महत्त्वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योग

सोलापूर : शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग महत्त्वाचा

सोलापूर : शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमित योग करणे अत्यंत आवश्यक आहे. योगाचा अर्थच निरोगी जीवन आहे. मानसिक शांती, समाधानासाठी आणि परमात्म्याशी जोडण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व जागतिक स्तरावर पटवून दिले आहे. त्याचा अधिक व्यापक प्रमाणात प्रसार करावा, अशी अपेक्षा खासदार डॉ. जयसिद्धे‍श्वर महास्वामी यांनी व्यक्त केली. मंगळवारी (ता. २१) आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय सोलापूर, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र आणि योग समन्वय समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मानवतेसाठी योगा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, सहाय्यक पोलिस अधीक्षक साई कार्तिक, नेहरू युवा केंद्राचे माजी राज्य संचालक प्रमोद हिंगे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार, योग समन्वयक मनमोहन भुतडा, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, पोलिस उपायुक्त दीपाली धाटे, उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, तहसीलदार अंजली कुलकर्णी, मच्छिंद्र सकटे आदी उपस्थित होते

यावेळी जैन गुरुकुल प्रशालेच्‍या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांनी म्युझिकल योगाच्या माध्यमातून अतिशय अवघड अशा कसरती करून उपस्थितांची मने जिंकली.

ठळक बाबी

जैन गुरुकुल प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी म्युझिकल योगासने करून वेधले उपस्थितांचे लक्ष

कार्यक्रमाच्या सुरवातीपासूनच सोलापूर शहरातील पोलिस बँडचे देशभक्तिपर गीतगायन

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सकाळी सहापासूनच उपस्थितांनी गर्दी

यांचा होता

प्रमुख सहभाग

जिल्‍हाधिकारी कार्यालय, पोलिस आयुक्‍तालय, जिल्‍हा परिषद, महापालिका, पोलिस अधीक्षक कार्यालय, पुण्‍यश्लोक अहिल्‍यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, राज्य राखीव पोलिस दल, पोलिस प्रशिक्षण केंद्र, एन. सी. सी. बटालियन ९ व ३८, जिल्‍हा माहिती कार्यालय, राष्‍ट्रीय सेवा योजना, सहसंचालक उच्‍च शिक्षण कार्यालय, भारत स्‍काउट-गाइड, पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, दि आर्ट ऑफ लिव्हिंग, विवेकानंद केंद्र, भारतीय योग संस्‍था, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, गीता परिवार सर्व कल्‍याण योग, रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्ट अॅंड योग, योग परिषद आणि योग साधना सेवासदन संस्था.

Web Title: Solapur Yoga Important Physical Mental Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top