Solapur ZP Result
esakal
सोलापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचंड क्रेझ असलेल्या ‘तुतारी’चा आवाज जिल्ह्याच्या राजकारणातून गायब झाला आहे. नगरपरिषद निवडणुकीत अकलूज पुरती मर्यादित राहिलेली तुतारी आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माळशिरस तालुक्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील (Dhairyasheel Mohite-Patil) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हा परिषदेच्या ५ व राष्ट्रवादी काँग्रेसची १ अशा ६ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तुतारीचा सुपडा साफ झाला आहे.