
सोलापूर : Zp, पंचायत समितीचेआरक्षण आज होणार अंतिम
सोलापूर : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. २ ऑगस्टअखेर मुदतीत जिल्हा परिषद गटासाठी १९ तर पंचायत समित्यांसाठी १० अशा एकूण २९ हरकती दाखल झाल्या. या हरकतींचा विचार करून उद्या (शुक्रवारी) आरक्षण अंतिम केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या ७७ तर पंचायत समितीच्या १५४ जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियासांठी राखून ठेवावयाच्या जागा या सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या होत्या. आरक्षणाचे प्रारुप २९ जुलै रोजी प्रसिद्ध करून त्यावर २ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.
दरम्यान, बुधवारी राज्य शासनाने महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या २०१७च्या प्रभाग रचनेप्रमाणेच घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता प्रभाग रचना, गट आणि गणातही बदल होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाचा आपल्याला अद्याप कसलाही आदेश प्राप्त झाला नसल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वीचीच प्रक्रिया सुरू ठेवली आहे.
Web Title: Solapur Zp Panchayat Samiti Election Reservation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..