

Solapur Zilla Parishad meeting focused on development fund allocation.
Sakal
सोलापूर: जानेवारी महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मार्च महिन्यात जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प असणार आहे. यामुळे नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांना पहिल्याच बैठकीत विकास कामांना निधी देण्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. १० ते २० लाख रुपये प्रत्येक सदस्यांना मिळावेत, यासाठी प्रशासनाकडून तरतूद करण्यात आली आहे.