

6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
sakal
सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्षांचा रूबाबच वेगळा असून, पदावर बसलेल्या व्यक्तीला शासनाच्या नियमानुसार मानधनाबरोबरच सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यात येतात. मानधनापासून मोफत निवासस्थान, आलिशान चारचाकीसह इंधन, दूरध्वनी व प्रवासभत्ता दिला जातो. अध्यक्षांना दरमहा २० हजार रुपये मानधनाबरोबर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वर्षाला ६ हजार लिटर इंधन पुरवले जाते.