लॉकडाउनचा पॉझिटिव्ह इफेक्‍ट ! लक्ष्मीनारायण टॉकीजचे देविदास गुंडेटी आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात 

Solapur Cinema
Solapur Cinema
Updated on

सोलापूर : तेलुगु फिल्म वितरण तसेच सिनेमा थिएटर चालविण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले सोलापुरातील लक्ष्मीनारायण सिनेमागृहाचे चालक देविदास गुंडेटी आता चक्क चित्रपट निर्मितीकडे वळाले आहेत. कोरोना लॉकडाउनवर आधारित "ब्यूटी गर्ल' या तेलुगु चित्रपटाची निर्मिती ते करीत आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे मार्च महिन्यापासून चित्रपटगृहे बंद आहेत. अनलॉक पाचमध्ये अर्थात ऑक्‍टोबरमध्ये देखील थिएटर्सवरील बंदी कायम आहे. 66 वर्षीय चित्रपटांच्या आवडीतून लक्ष्मीनारायण टॉकीजची निर्मिती केलेले देविदास गुंडेटी हे लॉकडाउनमुळे घरी बसून होते; पण त्यांचे मन अस्वस्थ होते. लॉकडाउनमध्ये देखील काहीतरी वेगळे करावे, असे त्यांना वाटायचे. याच विचारातून त्यांना एप्रिलमध्ये तेलुगु सिनेमा निर्मितीची कल्पना सुचली आणि ते याबाबत कामालाही लागले. तेलुगु चित्रपट दिग्दर्शक वेमुगंटी यांना त्यांनी चित्रपट निर्मितीचा मनोदय बोलून दाखविला. यावर वेमुगंटी यांनी ज्वलंत लॉकडाउन विषयावर आपल्याकडे कथा असल्याचे सांगितले आणि गुंडेटी यांनी या कथेवर चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. 

लक्ष्मीनारायण सिनेमा या बॅनरखाली गुंडेटी हे लॉकडाउनवर आधारित "ब्यूटी गर्ल' या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. श्रीनिवास तौटा हे चित्रपटाचे सादरकर्ते आहेत. कथा-दिग्दर्शन वेमुगंटी यांचे असून यामध्ये हैदराबादचा मॉडेल व बॉक्‍सर अल्ताफ आणि मुंबईची "मिस यूपी 2014', "मिस बिकिनी इंडिया युनिव्हर्स 2018' व मलेशियाचे "मिस कॉस्मो वर्ल्ड 2018' आदी पारितोषिके विजेती मॉडेल अर्चना गौतम ही नवोदित जोडगोळी प्रमुख भूमिकेत आहे. श्री. गुंडेटी यांच्यामुळे प्रथमच त्यांना नायक-नायिका म्हणून चित्रपटात ब्रेक मिळाला आहे.

एनी टाईम थिएटरवर (एटीटी) प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनच्या विळख्यात सापडलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुण-तरुणीवर चित्रपटाचे कथानक बेतले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेड्यूल नुकतेच हैदराबादमध्ये पूर्ण झाले आहे. एनी टाईम थिएटरवर (एटीटी) हा सिनेमा क्रमश: पद्धतीने लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक भाग अर्धा तासाचा असणार असून, त्याचे चार-पाच भाग असणार आहेत, असे गुंडेटी यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com