
सोलापूर: बंगलोर येथील केन्सिंगटन स्विमिंगमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ४१ व्या सब ज्युनिअर अन् ५१ व्या ज्युनिअर अॅक्वाटिक्स चॅम्पियनशिप २०२५ या राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना डायव्हिंग क्रीडा प्रकारात १९ वर्षे वयोगटात तीन सुवर्ण पदकांसह हॅट्ट्रिक साधली आहे.