

Somnath Mali Files Independent Candidacy for Mangalwedha Election
Sakal
मंगळवेढा : नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून नगराध्यक्ष कुणाचा आहे हे अद्याप सत्ताधाऱ्यांनी व विरोधी पक्षांनी अध्याप स्पष्ट केले नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सध्या महायुतीत असून तो भाजप आणि शिवसेनेबरोबर सत्तेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस लतीफ तांबोळी यांनी नगराध्यक्ष पदावरील दावा करत आपल्याकडे सक्षम उमेदवार असल्याचा केला होता परंतु अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.