

Sangola Murder Case: Mother Lodges Complaint After Son Kills Father
sakal
सांगोला : सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे कर्ज आणि शेती विक्रीच्या वादातून मुलानेच वडिलांचा लोखंडी पाईपने मारहाण करून खून केला. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश बटू कुंभार (वय ५४, रा. पाटील वस्ती, वाकी शिवणे, ता. सांगोला) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी समाबाई रमेश कुंभार (वय ५०) यांनी मुलगा अतुल रमेश कुंभार (वय ३०) याच्याविरोधात सांगोला ठाण्यात फिर्याद दिली आहे.