बैलांना पाणी पाजणारा, भाजी विकणारा, शेतभर हुंदडणारा सोन्या आईकडे जातो म्हणून गेला... पुढे सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला ! 

Aniket Amol Kharat.jpeg
Aniket Amol Kharat.jpeg
Updated on

सोलापूर : बैलांना पाणी-वैरण करणारा, डोक्‍यावर भाजीची टोपली घेऊन गावात फिरून भाजीपाला विकणारा सोन्या आईकडे जातो म्हणून गेला, तो आईकडे पोचलाही नाही आणि परत वस्तीवर आलाच नाही... तो आढळला वस्ती शेजारच्या मक्‍याच्या पिकात रक्ताच्या थारोळ्यात... गावकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडवणारी घटना मोहोळ तालुक्‍यातील वाळूज गावात 26 जानेवारीच्या दिवशी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. 

वाळूजच्या उत्तरेला वाळूज-तडवळे रस्त्यावरील खरात वस्ती... तसं तीन भावांचं सधन कुटुंब... भागवत रामचंद्र खरात या शेतकऱ्याचे तीन मुलांसह एकत्रित कुटुंब... अमोल, अजित व अविनाश अशी तीन विवाहित मुलं. या तीनही भावंडांना एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्ये... भागवत खरात यांचा मुला-नातवंडांचा मोठा राबता. अखंड वस्ती जागती. पैकी अमोल खरात हे गुळवंची येथील माध्यमिक शाळेत सेवक पदावर कार्यरत आहेत. मृत सोन्या ऊर्फ अनिकेत अमोल खरात (वय 10) याच्यासह सर्व नातवंडे वस्तीवर खेळत होती. तर घरातील मोठी माणसं शेताच्या कामात जुंपलेली. दहा वर्षाचा सोन्या इतर भावंडांना शेतात दूरवर काम करणाऱ्या आईकडे जाऊन येतो, असे सांगून गेला, तो परत आलाच नाही. तो दिसत नाही. वस्तीवरील कुत्री मोठमोठ्याने भुंकतात म्हणून घरातील भावंडांसह अनिकेतची आई, चुलते अजित यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, सोन्या कुठेच दिसत नव्हता. मक्‍याच्या दाट पिकांत हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता. त्याला त्वरित उपचारासाठी मोहोळ येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारपूर्वीच अनिकेत सर्व कुटुंबीयांना सोडून कायमचा दूरवर गेला जेथून परत आजपर्यंत कोणी आला नाही. 
 
वाळूजचा सोन्या, देगावकरांचा भाचा 
एकाच वेळी दोन गावांवर शोककळा 

हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडलेला सोन्या वाळूज (ता. मोहोळ)चा राहणारा आहे. त्याचे आजोळ हे वाळूजशेजारील देगाव (वा.) हे गाव. देगाव येथील घोडके कुटुंबीयांचा तो भाचा आहे. अचानक घडलेल्या दुर्घटनेत सोन्याचा बळी गेला आणि एकाच वेळी वाळूज व देगाव या दोन गावांवर शोककळा पसरली. ऐन 26 जानेवारीच्या दिवशी एका शालेय विद्यार्थ्याचा आणि शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्याच्या मुलाचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतभर मोठ्या धाडसाने हुंदडणारा, बैलांना न घाबरता धरणारा पाणी- वैरण करणारा हरहुन्नरी असा सोन्या अचानक गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनेकदा या परिसरात लांडगे, रानडुक्कर असे हिंस्र प्राणी मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने परिसरात घबराट पसरली आहे. हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करणारे निवेदन वन विभाग, तहसीलदार मोहोळ व पोलिस निरीक्षक यांना वाळूजच्या ग्रामसेवकांनी पाठवले आहे. 

त्वरित दखल 
मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांना ही बातमी समजताच त्यांनी त्वरित रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. वन विभागाच्या पथकाने घटनेनंतर त्वरित घटनास्थळाला भेट दिली. हिंस्र पशूच्या पायांचे ठसे कुठे सापडतात का, याचा शोध घेतला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे माजी सभापती सुशांत कादे यांच्यासह पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पोतदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत खरात कुटुंबीयांचे सांत्वन केले. मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी दूरध्वनीवरून खरात कुटुंबीयांस धीर दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com