सोयाबीन व तूर बियाणे दरवाढीचा फटका

farmer.jpg
farmer.jpg
Updated on

वडाळा(सोलापूर)ः खरीप हंगामासाठी शेतकरी कृषी केंद्रातून बी-बीयाणे व खते खरेदीसाठी धावपळ करीत आहेत. यंदा सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कांदा बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सूरू झाली आहे. 

बाजारात युरिया खताचा तुटवडा आहे. उत्तर तालुक्‍यात कृषी विभागाकडून खरीप हंगामात अंदाजे सोयाबीन 1300 हेक्‍टर, तूर 2061 हे., मुग 200, उडीद 700, मका 600 व भुईमुग 100 हे. पेरणीचे क्षेत्र नियोजन करण्यात आले आहे. 

तसेच शेतकऱ्यांनी घरगुती बीयाणे वापरताना चाचणी घेऊनच एकरी 70% उगवण क्षमता असेल तर वापरावे. उगवण क्षमता 70% पेक्षा कमी 68% आढळल्यास सरासरी 1 किलोने बियाणे जादा वापरावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी केले आहे. तसेच सध्या युरिया खताचा तुटवडा आहे. उत्तर तालुक्‍यासाठी 2000 टन युरियाची मागणी केली आहे. येत्या आठवड्यात युरिया उपलब्ध करुन देण्यात येईल असे पाचकुडवे यांनी सांगितले. 


बियाणांची दरवाढ 
सोयाबीन बियाणे गतवर्षी 1800रु. ची बॅग यंदा 2200 रु झाली आहे. खडका तूर प्रति किलो गतवर्षी 180 रु होते यंदा 220 रु.दर झाला आहे. उडीद बियाणे गतवर्षी 500 रु. किलोचे यंदा 700 रु. किलो झाले आहे. 

रास्त दरातच बियाणे हवे 
सध्या गेल्यावर्षी पेक्षा बियाणांच्या दरात मोठी वाढ झाल्याने ही दरवाढ नक्की कशामुळे व का झाली याची चौकशी कृषी विभागाकडून करावी. तसेच शेतकऱ्यांना योग्य रास्त दरांत बियाणे उपलब्ध करुन द्यावे. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यातच दरवाढ झाल्याने बीयाणे खरेदी करतानाच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. 
अमोल पाटील, शेतकरी बीबीदारफळ 

कृषी केंद्राची तपासणी सूरू 
शेतकऱ्यांना योग्य दरांत बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी कृषी केंद्राची तपासणी करण्यात येत आहे. तसेच बीयाणे विक्री करताना त्या बियाणांचे उगम प्रमाणपत्र तसेच स्टॉकबुक, इतर आवश्‍यक नोंदी असणे आवश्‍यक आहे. अन्यथा संबंधित कृषी केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 
नंदकुमार पाचकुडवे, तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com