ST Bus News: एसटी प्रवासात अडचण आल्यास आता थेट करा आगार प्रमुखांना फोन; महामंडळाचा अनोखा उपक्रम

The Maharashtra State Road Transport Corporation: स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
ST Bus News: एसटी प्रवासात अडचण आल्यास आता थेट करा आगार प्रमुखांना फोन; महामंडळाचा अनोखा उपक्रम
Updated on

Latest Solapur News: एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगार प्रमुखांना फोन करून सांगावी. जेणेकरून त्याचे तातडीने निराकरण होईल, अशा पद्धतीची यंत्रणा एसटी प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com