ST Strike | प्रवाशांनी पुन्हा गजबतेय एसटी बसस्थानक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

सोलापूर : प्रवाशांनी पुन्हा गजबतेय एसटी बसस्थानक

सोलापूर : मागील चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असला तरी, काही कर्मचारी आता कामावर परतू लागले आहेत. यामुळे प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानक परिसर पुन्हा गजबजू लागला आहे.

दरवर्षी उन्हाळा लागला की लग्नसराई, शाळांना सुट्ट्या यामुळे चाकरमानी गावी जाण्यासाठी बसस्थानकावर गर्दी करीत असतात. गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ओस पडलेला बसस्थानक परिसर पुन्हा प्रवाशांच्या गर्दी आता फुलून जात आहे. त्यामुळे एसटीची चाके पुन्हा वेगाने धावू लागली आहेत. फिरू लागली आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील चार महिन्यांपासून संपावर गेले आहेत. त्यातील अनेक कर्मचारी आता कामावर परतू लागल्याने एसटी तालुका आणि शहराअंतर्गत धावत आहे.

संपामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. परिवहन मंत्र्यांनी वेतनवाढीची घोषणा करुनदेखील कर्मचाऱ्यांनी विलिनीकरण होईपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा संप अजून किती दिवस चालणार असा सवालही प्रवाशांतून व्यक्त होत आहे.

कर्मचारी मागणीवर ठाम

सोलापूर एसटी आगारातील संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचारी कामावर आले आहेत. त्यामुळे आगारप्रमुखांना एसटी वाहतुकीचे नियोजन करणे सोपे होत आहे. चालक- वाहक यांत्रिकी कर्मचारी आणि प्रशासन विभागातील कर्मचारी कामावर रुजू झाले तरी अद्यापही काही कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

''मागील चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सोलापूर आगाराचे उत्पन्न बंद झाले होते. परंतु, अनेक कर्मचारी कामावर पुन्हा परतू लागल्याने एसटीची पुन्हा वेगाने धावू लागली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आगाराच्या उत्पन्नातही वाढ होऊ लागली आहे. दररोज सरासरी चार लाखांचे उत्पन्न सोलापूर आगाराला मिळत आहे.''

- दत्तात्रय कुलकर्णी, व्यवस्थापक, सोलापूर आगार

Web Title: St Bus Stand Is Full Of Passengers Again St Strike Continued

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top