सोलापूर विभागाची लालपरी सुसाट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लालपरी

सोलापूर विभागाची लालपरी सुसाट!

सोलापूर: एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पाच महिन्यांच्या संपानंतर एसटीची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोलापूर विभागातून जवळपास शंभर टक्के बसफेऱ्या पूर्वीप्रमाणे सुरू झाल्या आहेत. मार्गावर एसटी बस सुसाट धावत असून उत्पन्नात देखील मोठी भर पडत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे तब्बल पाच महिने लालपरी आगारांमध्ये थांबलेली होती. दरम्यान, महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संप स्थगित करण्यात आला.

२२ एप्रिलपर्यंत कर्मचारी कामावर रुजू होण्याचे आदेश येताच सोलापूर विभागातील आगारांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढली अन्‌ एसटी पूर्वपदावर आली. कर्मचाऱ्यांचा संप मिटला. लालपरी ग्रामीण भागातील गावोगावी धावत आहे. दोन वर्षांनंतर प्रवाशांना एसटीमधून प्रवास करता येत आहे. बस स्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे. सध्या ५७४ गाड्या महामार्गावर धावत असून दोन लाख १२ हजार किलोमीटरचा प्रवास होत आहे. २१०० फेऱ्या होत असून, यातून ६५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

आठवडाभरातील उत्पन्न

दिवस उत्पन्न (लाखात)

२५ एप्रिल ६३

२६ एप्रिल ६४

२७ एप्रिल ६२

२८ एप्रिल ६४

२९ एप्रिल ६५

सोलापूर विभागातील नऊ आगरांमधून शंभर टक्के वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावोगावी एसटी धावत असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. आगामी काळात आणखीन गाड्या वाढविण्याचे नियोजन सुरू आहे.

- सुरेश लोणकर,विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर

Web Title: St Corporation Employees Solapur Division Lalpari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top