

ST Corporation Under Fire as Employees’ Allowances and Bills Get Delayed
सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) चालक व वाहकांना कमी वेतनात संसाराचा गाडा ओढावा लागत असतानाच आता त्यांच्या हक्काचे विविध भत्ते आणि वैद्यकीय बिले रखडल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हजेरी प्रोत्साहन भत्ता, शिलाई भत्ता तसेच वैद्यकीय बिलांची थकबाकी तातडीने अदा करावी, या मागणीसाठी सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाने सोलापूर विभाग नियंत्रकांना निवेदन दिले आहे.