St Worker Strike : बसस्थानकातील विक्रेत्यांची उपासमार

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; एकही बस सुटली नाही
St Worker Strike : बसस्थानकातील विक्रेत्यांची उपासमार
St Worker Strike : बसस्थानकातील विक्रेत्यांची उपासमार sakal media

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी मागील आठ दिवसांपासून राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदचा सर्व स्तरावर परिणाम होत आहे. मागील आठ दिवसांपासून सोलापूर विभागातील ९ आगारातून एकही बस आगाराबाहेर न पडल्यामुळे बसस्थानकातील व्यवसाय करणारे तसेच बसमध्ये गोळ्या, बिस्किट विकणाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. एसटी कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी रविवार ता. ७ नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. जिल्ह्यातील नऊ आगारातील मिळून चार हजार २०० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. गेल्या आठ दिवसात आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे प्रवासी बसस्थानकाकडे फिरकत नाहीत. बस स्थानकात आठ दिवसापासून शुकशुकाट असल्याने बुक स्टॉल, उपहारगृह, चहा कॅन्टीन, पान टपऱ्या आदी दुकाने बंद आहेत.

St Worker Strike : बसस्थानकातील विक्रेत्यांची उपासमार
पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

व्यवसाय ठप्प; भाडे सुरू

मागील दहा बारा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसस्थानकातील वर्दळ अत्यंत कमी हो. यामुळे येथील व्यवसाय ठप्प आहेत. विक्री बंद झाली असली तरी बसस्थानकात व्यवसाय करण्यासाठी घेतलेल्या आस्थापना, टपऱ्यांची भाडे आकारणी मात्र नियमितपणे बसस्थानक व्यवस्थापनाकडून सुरू असल्याचे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले आहे. यापूर्वी कोरोना काळात लॉकडाउन लागू केल्यानंतर आणि एसटीचे प्रवासी वाहतूक बंद केल्यानंतरही बसस्थानकातील व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले होते. व्यवसाय बंद असताना भाडे मात्र आकारले जात होते. लॉकडाउन केल्याने व्यवसाय बंद असल्याने भाडे देऊ शकले नाहीत.

रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प

प्रवाशांना विविध ठिकाणी पोचविण्यासाठी बस स्थानक परिसरात ठिय्या मांडणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसायही ठप्प झाला आहे. मागील दहा, बारा दिवसांपासून बसस्थानकातून बस सुटल्या नसल्यामुळे रिक्षाचालक आता शहरात फिरून व्यवसाय करीत असल्याचे बसस्थानक परिसरातील रिक्षाचालकांनी सांगितले.

St Worker Strike : बसस्थानकातील विक्रेत्यांची उपासमार
संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

"मागील आठ दिवसांपासून एसटी बंदमुळे रिक्षा व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बस बंद असल्याने बसस्थानक परिसरात व्यवसाय नसल्याने आता शहरात फिरुन व्यवसाय करावा लागत आहे. व्यवसाय नसल्याने कुटुंब चालविणे कठीण बनले आहे."

- महेश बनसोडे, रिक्षाचालक

"पूर्वी लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद पडला होतो. त्यामुळे आता कुठे तरी सर्व काही पूर्वपदावर येत असताना एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे एसटी बंद असल्याने रिक्षा व्यवसाय नसल्याने आर्थिक संकट ओढावले आहे."

- सचिन गवळी, रिक्षाचालक

"बसमध्ये फळे विकून कुटुंबाचे पोट भरत असताना व्यवसाय मागील आठ दिवसांपासून बंद असून, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे."

- प्रदीप काळे, फळविक्रेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com