
सोलापूर : शिक्षणमहर्षी कै. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या नऊ फूट उंच पुतळ्याचे शुक्रवारी मोठ्या थाटात अनावरण करण्यात आले. पंचधातुपासून बनवलेल्या या पुतळ्याचे अनावरण जलसंधारणमंत्री संजय राठोड आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांची मांदियाळी उपस्थित होती.