
प्रमोद बोडके
सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सध्या गुप्त भेटींना वेग आला आहे. भाजपकडे बाजार समितीचे संख्याबळ नाही. परंतु केंद्र व राज्यातील सत्ता आणि राष्ट्रीय बाजारचे प्रभावी अस्त्र आहे. काँग्रेस नेते माजी आमदार दिलीप माने व जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्याकडे मतदार आहेत. परंतु बाजार समितीची सत्ता मिळाली तरी मनसोक्त काम करण्यासाठी राज्यातील सत्तेची साथ आवश्यक ठरणार आहे. बाजार समितीच्या राजकारणात माने-हसापुरे व भाजप या दोघांनाही एकमेकांची गरज असल्याने यंदाच्या निवडणुकीत ‘एक रहो, सेफ रहो’चा फॉर्म्युला पुढे येण्याची दाट शक्यता आहे.