मोहोळ - जेवण करीत नाही, शाळेला का जात नाही, या क्षुल्लक कारणाचा राग येऊन एका 3 वर्षीय चिमुकलीचा गळा दाबून तिच्या सावत्र आईनेच खून केल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजण्यापूर्वी वडवळ फाटा, ता. मोहोळ येथे घडली. कीर्ती नागेश कोकणे (वय-3) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे वडवळ परिसर हळहळला आहे.