
सोलापूर : शेअर मार्केटच्या आमिषातून ४२ लाख १० हजार रुपयास फसलेल्या मंद्रूपच्या तरुण व्यावसायिकास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी चार महिने तपास करून ती रक्कम परत मिळवून दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी त्या तरुणास तेवढ्या रकमेचा धनादेश दिला.